Mata

 

नवसाला पावणारी आणि ५१ पेक्षा अधिक कुळांची कुलदेवता असणाऱ्या साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर धनदाई मातेचे मंदिर वसले आहे . सातपुडा ...

अधिक वाचा ! »

 

धनदाई माता खालील कुळांची कुलदेवता आहे. देवरे, खैरनार, वाघ, देसले, बेडसे, भुसे, बेंडाळे, रौंदळ, गायकवाड, वेंडाईत, कुंवर, तोरवणे, सायाईस, खैरे ...

अधिक वाचा ! »

How to go

 

धनदाई मातेचे मंदिर साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर वसले आहे . राष्ट्रीय महामार्ग ६ (NH-6) ने प्रवास करू शकता ...

अधिक वाचा ! »


Dhandai Mata

कथा देवी अवताराची !


देवी अवताराची कथा मोठी विलक्षण आहे. देवरे कुळातील आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे नयगावी वास्तव्यास आले . त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थाफना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टीना कंटाळून तिथून जवळचा असलेल्या नदीपलीकडील त्याकाळचे म्हीसपाडा म्हणजेच आजचे म्हसदी या ठिकाणी स्तलांतर केले .त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या मूर्तीला शेंदूरलावल्यामुळे ती मूर्ती शेंदूरमुले लुप्त झालीव त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्ष्यात आले नाही . कालंतराने हे देव्स्तान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्य असणारे भिल्ल त्या देवस्थान चा सांभाळ करू लागले. इसवी सन १९६४ मध्ये धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले .साक्री येथील पोस्टमास्तर यांची पत्नी सौ .प्रमिला कुलकर्णी यांच्या अंगात देवीचा संचार झाला.धनदाई देवी त्यांच्या स्वप्नात येऊ लागली. त्यानंतर त्या स्वफुर्तीने धनदाई देवीच्या दर्शनासाठी म्हसदी गावात आल्यानंतर त्यांच्या अंगात देवीने संचार केला व येथून त्या देहभान विसरून धनदाई देवीच्या मंदिराकडे धावत सुटल्या . गावातील अनेक व्यक्ती त्यांचा मागे मंदिरापर्यंत येऊन पोचले . त्यांनी देवीची गळाभेट घेतली आणि त्या मूळ मूर्तीची तिथले शेंदुरलेपण विलग झाले. तिथे प्रकाश केल्यानंतर शेंदूर निघालेल्या ठिकाणी देवीचा कोरीव मुकुट असल्याचे दिसले. मुर्तीवरला शेंदूर काळजीपूर्वक काढण्यात आला तेव्हा आत मध्ये साडेतीन फुटाची सुबक कोरीव मूर्ती भक्तांच्या निदर्शनास आली .

मुखपृष्ठ


Dhandai Mata Photo

माझे कुलदैवत ?


धनदाई माताही या कुळांची कुलदेवता आहे. देवरे, खैरनार, वाघ, देसले, बेडसे, भुसे, बेंडाळे, रौंदळ, गायकवाड, वेंडाईत, कुंवर, तोरवणे, सायाईस, खैरे, नेरपगार, सत्ताविसकर, धोंडगे, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, मांडवडे, पवार, ईशी, सूर्यवंशी, केदार, खराटे, गांगुर्डे, साळी, धोंगडे, नांद्रे, खोलामकर, कडभाने, शंकपाळ, विश्वास, माळी, गिरासे, व्यवहारे, शिंदे, डबे, तुपे, अमराळे, महाले, चव्व्हान, ठोंबरे, निकुंभ, डामरे, परांडे, इंगळे, मोराडे, श्रीवांत आदी .

मुखपृष्ठ


म्हसदीला कशे जावे ?


धनदाई मातेचे मंदिर साक्री तालुक्यातील म्हसदी गावालगत दीड किलोमीटर अंतरावर वसले आहे . नकाशामध्ये हिरव्या रंगाचा एक 'D' दाखवला आहे तेथे आहे म्हसदी गाव !! तुम्ही जर धुळे किवां साक्री-मार्गे जात असाल तर राष्ट्रीय महामार्ग ६ (NH-6) ने जाऊ शकता. म्हसदी हे साक्री पासून २० किलोमीटर अंतरावर आहे .

मुखपृष्ठ


फेसबुक
तुमच्या प्रतिक्रिया इथे नोंदवा ...!
comments powered by Disqus

मुखपृष्ठ




 
 

dhandaimata.com@gmail.com

धनदाई माते बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला नक्की पाठवा ! काही तक्रारी व विनंती असल्यास तुम्ही आम्हाला इमेल करू शकता !

मुखपृष्ठ